मुस्लिम बांधवासाठी रमजान सण हा अत्यन्त महत्वाचा असून या महिन्यात मुस्लिम बांधव एकत्र येतात आणि नमाज पठण करतात परंतु सध्या कोरोना विषाणूने जगभराच्या डोक्यावर तलवार लटकवली असल्याने व कोरोना रोग संसर्गजन्य असल्याने याची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस तातडीने होते म्हणून रमजान महिन्यातील तराबी नमाज कोरोना १९ परिपत्रकानुसार अदा करून प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांनी केले
सध्या कोरोना रोगाचे संकट भयानक रूप घेत असल्याने दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे शासन विविध उपाययोजना आखात असून गर्दी न करणे हा उपाययोजनेमधील महत्वाचा भाग आहे त्यामुळे जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लागू केल्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या आदेशाने जमावबंधी आदेशाची अमल्बजावीं सुरु आहे,मुस्लिम बांधवांचा रमजान महिना २५ एप्रिल पासून सुरु होत असल्याने दक्षता म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी मुस्लिम धर्मगुरुची बैठक घेण्याचे आदेश जालना जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांना दिले त्यानुसार बदनापूर पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनखाली बदनापूर शहरासह तालुक्यातील मुस्लिम धर्म गुरूंची बैठक बदनापूर पोलीस ठाण्यात २२ एप्रिल रोजी घेतली या बैठकीत अंतर राखून सर्वांची बैठक व्यवस्था करण्यात आलीहोती
मुस्लिम धर्म गुरूंना मार्गदर्शन करतांना पोलीस निरीक्षक मारोती खेडकर म्हणाले कि ,रमजान महिन्यात माईक मधून अजान देता येईल व नमाज पठाण देखील माईक द्वारे करता येईल परंतु रोज इफ्तार साठी जमाव करू नये व कोरोना १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सर्वानी घरातच नमाज पठण करावी व देवाची भक्ती करून आपलो व आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घ्यावी या बैठकीस मौलाना अय्युब,मौलाना महेमूद,मौलाना नसीर ,मौलाना अख्तर,मौलाना रशीद,मौलाना जावेद,मौलाना अलीम,मौलाना मुफीद,मौलाना अतिक,मौलाना इब्राहिम,मौलाना हारून,आदी उपस्थित होते
-------------------------------
हाजी सय्यद चांद- आमिर जमा मस्जिद बदनापूर
२५ एप्रिल पासून मुस्लिम समाजात अत्यन्त महत्वाचा समजला जाणारा रमजान महिना सुरु होत असून या महिन्यात उपास ठेवले जातात तसेच दररोज मस्जिद मध्ये एकत्रित येऊन तराबी नमाज च्या माध्यमातून नमाज अदा केली जाते परंतु सध्या कोरोना रोगाचे संकट आलेले असल्याने व या रोगाला थाम्बविण्यासाठी साखळी तोडणे आवश्यक असल्याने मुस्लिम समाज बांधवानी घरातच रोजा इफ्तार करावा व ताबी नमाज देखील घरात पठण करून प्रशासनास सहकार्य करून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी .
No comments:
Post a Comment