प्रतिनिधी संदिप पोवार
कोल्हापूर - गेल्या 18 दिवसापासून कसबा बावडा येथील मराठा कॉलनी आणि लाईन बाजार परिसरातील सर्व वसाहतीत कार्यरत सफाई कर्मचारी आशा वर्कर यांचा सत्कार आज लाईन बाजार प्रभागाच्या नगरसेविका माधुरी लाड आणि संजय लाड यांनी जीवनावश्यक साहित्य देऊन केला.यावेळी भागातील डी.डी.पाटील,नामदेव ठाणेकर,विष्णू जाधव,समीर मुजावर शिवाजी ठाणेकर,दिगंबर साळोखे,प्रशांत पाटील,मोहन माळी, कपिल पुंगावकर,सचिन मोरे,शुभम लाड आदींसह रहिवाशी उपस्थित होते.
कसबा बावडा येथील मराठा कॉलनीत 6 एप्रिल रोजी कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता.त्या दिवसापासून आजतागायत कोल्हापूर महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी या परिसरात सातत्याने साफसफाई करण्याचे मोलाचे काम केले.त्याच बरोबर आशा वर्करनी सुद्धा दररोज मराठा कॉलनीमध्ये आणि अन्य वसाहतीमध्ये सर्दी पडसे, आणि तापाचे रुग्ण आहेत का याबाबतचे सर्वेक्षण सुरू ठेवले,त्यामुळे या सर्वांचा आज नगरसेविका माधुरी लाड यांनी जीवनावश्यक साहित्य देऊन सत्कार केला.तसेच मराठा कॉलनी फ्रेंड्स सर्कलचे प्रतिनिधी म्हणून विष्णू जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या 18 दिवसापासून अहोरात्र बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment