सॅनिटायझर, मास्क चे नागरिकांना वाटप
साके ग्रामपंचायतीचा उपक्रम ः गावात स्वच्छता मोहीम यशस्वी
साके प्रतिनिधी ः सागर लोहार
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत साके ता.कागल च्या पदाधिका-यांनी गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी संपुर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवून गावातून गल्ली-बोळातून ट्रॅक्टरपंपाच्या माध्यमातून औषध फवारणी,व पावडर टाकण्यात आली. त्याच बरोबर कोरोना रोगासंदर्भात सर्वेक्षण करणा-या आशा,स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक यांच्या मार्फत गावातील पाच हजार नागरिकांना मास्क,सॅनिटायझर चे ग्रामपंचायती कडुन मोफत वाटत सरपंच रघुनाथ पाटील, ग्रामविकास अधिकारी शुभांगी पुरेकर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कोरोना प्रतिबंधक समितीच्या माध्यमातून गावात जनता कर्फ्यु यशस्वीरित्या राबविण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. उपसरपंच सैा.सुनिता बाचणकर, तेजस्वीनी पाटील, दिपाली मुसळे, शहाजी पाटील,आरोग्य सहायिका एस आर तबलजी, तलाठी सुनील भातमारे,कृषिसहायक संतोष पोवार आदी उपस्थीत होते.
फोटो - साके य़ेथे ग्रामपंयातीमार्फत आशासंघटक,अंगणवाडी सेविका,आरोग्यसेविका शिक्षक यांना सॅनिटायझर, मास्क चे वाटप करतांना सरपंच रघुनाथ पाटील,ग्रामविकास अधिकारी शुभांगी पुरेकर आदी.
--
No comments:
Post a Comment