Tuesday, 28 April 2020

बेलवळे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटपअशोक पाटील यांचा सामाजिक उपक्रम ः, शेकडो कुटूंबाला लाभ

बेलवळे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अशोक पाटील यांचा सामाजिक उपक्रम ः,  शेकडो कुटूंबाला लाभ
साके प्रतिनिधी ः सागर लोहार 
बेलवळे बु ता.कागल येथील गोसावी वसाहतीमध्ये  शिवसेनेच्या वतीने  तालुका प्रमुख अशोक पाटील बेलवळेकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले .
सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या भयंकर रोगामुळे बेलवळे बुद्रुक मधील गोसावी वसाहतीत राहणारे दहा कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला असून या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन   तालुका प्रमुख अशोक पाटील यांच्यावतीने या गरीब कुटूंबियांची उपासमार होवू नये यासाठी जीवनावश्यक  वस्तू तांदूळ, बटाटे कांदे साखर इत्यादी वस्तूंचे  वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. यावेळी
  सरपंच सुनीता चांदणे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, संभाजी पाटील,  डॉ .के. एम. पाटील,अशोक चांदणे   हरिभाऊ पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक सुदाम पाटील, सागर पाटील ,राजू कोळी पाटोळे सर ,संजय गायकवाड, पी एन पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते 
फोटो  ः बेलवळे बुद्रुक येथील गोसावी वसाहती मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना तालुका प्रमुख अशोक पाटील,सरपंच सुनिता चांदणे, के एम पाटील, आदी

No comments:

Post a Comment