Sunday, 26 April 2020

दारुड्यांना दम निघेना की दुकानदारांना ? सोशल डिस्टन्सिंगसाठीची तयारी सुरू

एकदा काय झालं तीन देशांचे दारुडे स्वर्गात भेटले. इजिप्तचा दारुडा खाली पृथ्वीकडे बोट दाखवून म्हणाला, खाली जी मोठी लाईन दिसते ती आमच्या देशातील आणि जगातील सर्वात मोठी नदी आहे. त्यावर चीनचा दारुडा म्हणाला, शक्यच नाही ती तर आमच्या देशातील आणि जगातील सर्वात मोठी भींत आहे. आपला दारुडा म्हणाला, दोघांचही चूक, अरे शहाण्याने ही तर महाराष्ट्रातील आणि जगातील सर्वात मोठी लाईन आहे ती वाईन शॉप समोरची दारुड्यांची लाईन आहे. हा जरी विनोद असला तरी लॉकडाऊनंतर अशीच काहीशी अवस्था पहायला मिळण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन संपत आला आहे असे वाटून कोल्हापूरात काही दुकानासमोर आतापासूनच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी पांढरे पट्टे मारायला सुरुवात झाली आहे. यावरुन घाई कोणाला दारुड्यांना की दुकानदारांना असा प्रश्न सर्व सामान्य माणसाला पडला आहे. मात्र लॉकडाऊन असताना दारु बंदी मुळे गुन्हेगारीचा आलेख हा चांगलाच डाऊन झाला होता हेही विसरता कामा नये. 

No comments:

Post a Comment