उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
कोरोना सारख्या वैश्विक महामारीने महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असतानाच काल उदगीर मध्ये एक रुग्ण सापडल्याने ग्रामीण भागात रिकाम्या फिरणाऱ्या टोळक्याला पोलीस प्रशासन सळो कि पळो करून सोडले असुन त्यांचे धाबे दणाणले आहे. ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी, ओठ्यावर बसणारे,रिकाम्या ठिकाणी गर्दी करणारे, करमणूक म्हणून जुगार खेळणारे ,उगीचच गाडीवर फिरणारे तरूण ,अनावश्यक फेरफटका मारायला गेलेल्या नागरिकांना आता चांगलेच फटके बसत आहेत. पोलीस पेट्रोलिंग करताना अनेक महाठग फिरत आहेत, त्यांनाही आता चांगलाच चाप बसणार आहे. निर्धारित वेळेतच किराणा,आवश्यक कामासाठी बाहेर जावे. तसेच बाहेर जाताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे, त्याचबरोबर आवश्यक दुकानदारानी सोशल डिस्टन्सींग चे पालन काटेकोरपणे करावे. तसेच वाढवणा परिसरातील सर्व गावातील नागरिकांनी बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवून घेणे, वैयक्तीक स्वच्छता करावी. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने नियम आणखी कडक केले आहेत.सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असेही कळवण्यात आले आहे.
परिसरातील सर्व गावातील जबाबदार व्यक्तीने आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडुन सरकारला मदत करावी.
बाहेर जिल्हातील आलेल्या व्यक्तींची माहिती द्यावी
वाढवना पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांनी आपल्या गावी कोणी विना पास परवाना चोरून लपून बाहेर जिल्हा व राज्यातून आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावे. आपले नाव गोपनीय ठेवले जाईल तसेच असे लोक ज्यांचे कडे असतील त्यांनी जर माहिती लपवली तर त्यांचे वर देखील गुन्हे दाखल केले जातील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे .
स.पो. निरीक्षक बाळासाहेब नरवटे
फोटो
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढवणा परिसरातील गावा गावात जाऊन पोलीस प्रशासन गस्त घालत आहेत.
No comments:
Post a Comment