प्रतिनिधि: प्रमोद झिले हिंगणघाट
हिंगणघाट तालुक्यामध्ये येत असलेल्या पोहणा या गावी राष्ट्रीय महामार्ग क्र.7 पोहणा येथे उड्डाण पल देण्यात आला, या पुलावर जीवघेणे खड्डे पडले असुन गेल्या 2 महिन्यात या पुलावर बरेच अपघात झाले आहे, या रोडचे काम मारोती कंपनी कडे होते एका वर्षातच या रोडचे तिन तेरा झाल्याची चर्चा परिसरात होताना दिसत आहे.
कोरोनाचे संकट देशावर आहे सगळीकडे बंद असल्यामूळे वाहतुक कमी झाली आहे, 24 तास रहदारी असणारा हा राष्ट्रीय महामार्ग दळण वळण कमी झाल्याने अपघाताचे प्रमाण कमी आहे परंतू लॉकडाऊन संपल्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग नेहमीप्रमाणे सुरु होईल,युवासेनेच्या वतीने जबाबदारी पार पाडत पोहणा येथील उड्डाण पुलावर जावुन खड्डयाची पाहणी केली व ऑनलाईन ईमेल द्वारे केंद्रीय परिवहनमंत्री नितीनजी गडकरी यांना निवेदन देण्यात येत आहे. या रोडचा दर्जा खुपच खालावल असुन वर्धा नदीवरील पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्ज्याचे केले आहे.या पुलावरिल अपघात थांबवण्यासाठी रोड तत्काळ खड्डेमुक्त करावे. यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक रंजित रहाटे, युवासेना तालुकाप्रमूख निखील वाघ, पोहणा उपसर्कल प्रमूख मोहन पडवे,मंगेश सोनटक्के उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment