विक्रमी वेळेत गडमुडशिंगीत थेट पाईप लाईनने आले पंचगंगेचे पाणी: पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली
गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
अवघ्या अडीच महिन्याच्या विक्रमी वेळेत भगीरथ प्रयत्नांनी तब्बल पावणेचार किलोमीटर वरून थेट पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करीत विकास कामांच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीचा एक नवीन आदर्श कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने करून दाखविला आहे. कृषी सिंचन , गायरान जमिनीवरील केलेल्या वृक्ष लागवडी करिता, जनावरांकरिता, इतर अनेक कामांकरता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवणारी गडमुडशिंगी ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या पाणी योजनेचे पाणी थेट गाव तलावात सोडल्यामुळे नीचांकी पातळीवरील पाणी व वाढलेल्या ग्रीन अल्गी मुळे गाव तलावाची झालेली दुरवस्था संपुष्टात येऊन तुडुंब भरलेल्या तलावामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. यासाठी गावचे सरपंच तानाजी पाटील यांनी अहोरात्र भगीरथ प्रयत्न करून अल्पावधीत ही योजना सुरू केल्यामुळे संपूर्ण गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वच स्तरातील नागरिकांकडून सरपंच तानाजी पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदरची योजना १४ वा वित्त आयोग व ग्रामपंचायत स्वनिधीतून साकारण्यात आली असून या योजनेसाठी एक कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च आला आहे.
या योजनेमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व प्रशासकीय परवाने, विद्युत पुरवठा व पाइपलाइनच्या मध्ये येणाऱ्या रेल्वे लाईनच्या संबंधित परवानगी यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांचे ग्रामपंचायतीस मोलाचे सहकार्य लाभले.
या योजनेच्या यशस्वीतेसाठी सरपंच तानाजी पाटील यांच्या बरोबरच ग्रामसेवक आर्. एन गाढवे, ग्रामपंचायत सदस्य अशोक दांगट ,सुधाकर पाटील ,बाबासाहेब पाटील, रणजीत राशिवडे, बाबासाहेब रानगे, उमेश मगदूम, अमित माळी व सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचेही सहकार्य लाभले. त्याच बरोबर या पाइपलाइनच्या मार्गात येणाऱ्या सर्वच मिळकत धारकांनी व शेतकऱ्यांनी विकास कामांसाठी अडवणूक न करता ग्रामपंचायतीस मोलाचे सहकार्य केले.
1 comments:
Write commentsAmit waydande-7721084020
Reply