कंदलगाव - प्रकाश पाटील ,
गेल्या दोन महिण्या पासून कोरोना विषाणूंचा प्रसार थांबविणेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित होते . तसेच कोरोनामुळे संचारबंदी असल्याने कामगारवर्ग घरीच आहे .आशावेळी पोषण आहाराचा तांदूळ , डाळ लाभार्थी विद्यार्थ्यांना देणेबाबत जिल्हा प्रशासनाच्या आदेशा नुसार शालेयस्तरावरील शिल्लक पोषण आहारातील तांदूळ , डाळ गरजू विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स ठेऊन वाटप करण्यात आले .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर .बी. पाटील , पर्यवेक्षक बी .वाय.परकाळे , शिक्षिका सौ . व्ही .पि .बिर्जे , सौ .एस.आर. कुलकर्णी , सौ .एस.एस. भोसले , सौ .पि .एस. खेडकर , श्री .पि .एस. ढेंगे , के.पि . कुवर , शिपाई एस .एस. औरनाळे , डी .एस. सागावकर यांची उपस्थिती होती .
फोटो - रत्नाप्पा कुंभार हायस्कूल येथे पोषण आहाराचे साहित्य वाटप करताना शिक्षक व पालक .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )