Wednesday, 22 April 2020

वाढदिवसाला फाटा देत सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्य वाटप ...

कंदलगाव प्रतिनिधी प्रकाश पाटील 
      वाढदिवस म्हटले कि नविन कपडे , बुट या सह मौज करण्यासाठीचा दिवस असतो . मात्र मोरेवाडी येथील भारती नगर येथे राहणाऱ्या आरव कारंडे या नऊ वर्षाच्या मुलाने स्वतः वाढदिवस साजरा न करण्याचा मानस आपल्या वडिलांना बोलून दाखविला . वाढदिवसासाठी हट्ट करणाऱ्या मुलाकडून असे शब्द ऐकताच हरीश कारंडे आश्चर्यचकित झालेत .
     यावेळी आरवने सध्या चाललेल्या परिस्थितीची जाणिव करून देत वाढदिवस न करता त्या बदल्यात सर्व सफाई कामगारांना अन्नधान्य वाटप करण्याचेे बोलून दाखविले .
    मुलाच्या इच्छेनुसार मोरेवाडी परिसरातील सर्व सफाई कामगारांना अन्नधान्य वाटप केले . आरवने घेतलेल्या या निर्णयाबद्दल परिसरात त्याचे कौतूक होत आहे .
फोटो  - मोरेवाडी येथील सफाई कामगारांना अन्नधान्य वाटप करताना आरव कारंडे व कारंडे कुठूंब .

No comments:

Post a Comment