Monday, 27 April 2020

लॉकडाऊनमुळे कंटाळलाय ? आपल्यासाठी अनोखी स्पर्धा तीही अॉनलाईन

कोल्हापूर प्रतिनिधी.           सध्या लॉकडाऊनमुळे सगळे जण कंटाळले आहेत. या कंटाळलेल्या जीवाला काहीतरी क्रिएटिव्ह असा विरंगुळा मिळावा याबरोबरच आपल्यातला रसिक आणि कलाकार जागा व्हावा म्हणून कोल्हापूरच्या प्रशांत जोशी यांनी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीने अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे.     

रसिका श्रोत्यांसाठी एक अनोखी स्पर्धा.....
अनेक गायक गायिकांनी आपल्या गायनाने रसिका श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलंय. गाणी ऐकणे, त्याचा रसास्वाद घेणे हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्यात एखादा असा गायक किंवा गायिका आपल्याला खूप आवडते... त्यांचं गाणं ऐकावस वाटतं... बोला आशा गायक अथवा गायिके बद्दल...भरभरून बोला....                                        
आदरणीय ज्येष्ठांनो ......
तुमच्या तरुणाईच्या काळात तुम्हाला एक असा अभिनेता किंवा अशी अभिनेत्री आवडत असेल की जिच्यासाठी तुम्ही अक्षरशः जीव ओवाळून टाकत होतात...
चला तर मग...सहभागी व्हा...
जे आवश्यक आहे...ते करायला हवेच...                      
 सर्व शिक्षक शिक्षिकांनो
सर्व शिक्षक शिक्षिकांनी अवश्य सहभागी व्हावे..
जे आवश्यक आहे...ते करायला हवेच...
अशा प्रकारच्या या अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत जोशी यांनी आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment