Thursday, 30 April 2020

शेतकरी पेट्रोलियम सामाजिक फौंडेशन तर्फे लॉक डाऊन मध्ये अडकलेल्यांना मोफत भोजनाची सोय

नंदगाव प्रतिनिधी : विजय  हंचनाळे            नंदगाव ( ता - करवीर ) येथिल सेवाभावी मनाचे उद्योजक श्री . बापुसो दिनकर दिंडोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप बापुसो दिंडोर्ले , व विजय बापुसो दिंडोर्ले या युवकांनी शेतकरी पेट्रोलियम सामाजिक फौंडेशन तर्फे लॉक डाऊन मुळे हवालदिल झालेल्या वाहनचालकांना मोफत भोजनाची सोय केली.   पुणे - बेंगलोर महामार्गावर अडकलेल्या ट्रक चालक , क्लिनर यांच्या जेवणाचे हॉटेल बंद असल्याने  हाल झाले होते . दररोज त्यांना मोफत जेवण सुरक्षीत अंतर राखून पुरवण्यात येत आहे . तसेच यापुर्वी ही नंदगाव मध्ये तिन हजार मास्क वाटप करण्यात आले तसेच नंदगावमधील गोरगरिब , शेकडो कुटूंबियांना  एक महिना पुरेल इतक्या किराणामध्ये   बाविस जिवनावश्यक वस्तू  देण्यात आल्या . मागील वर्षी महापूराच्या संकटावेळी ही पाण्यामुळे महामार्ग वर अडकलेल्या शेकडो प्रवाशांना जेवणाची व्यवस्था स्वछ पाणी , फळे  अंगावर ब्लॅंकेटची व्यवस्था केली होती . शेतकरी पेट्रोलियम सामाजिक फौंडेशनचे विश्वस्त उदयोजक बापुसो दिंडोर्ले , तसेच दिलीप दिंडोर्ले , विजय दिंडोर्ले यांच्या दातृत्वाचे नंदगाव व परिसरातील ग्रामस्थांच्याकडून कौतुक होत आहे .

No comments:

Post a Comment