Thursday, 30 April 2020

धावत्या ट्रकने पेट घेतला

धावत्या ट्रकने पेट घेतला
प्रतिनिधि:प्रमोद झिले येरला हिंगणघाट 
येरला:- जवळील वर्धा नदीच्या पुलावर तपासणी नाक्यालगत पुलाच्या मधोमध चालत्या ट्रकने पेट घेतला.हैद्राबाद वरुन गाझियाबाद कडे जाणार्या ट्रक क्र.HR 65 A 5623 या ट्रकने अचानक पेट घेतल्याने तपासणी नाक्यावर जिल्हाबंदी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी आग विझवन्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत आगीने रौद्ररुपधारण केले.पुलावर मधोमध ही घटना घडल्यामुळे काही काळापर्यंत ट्राफिक जाम झाली होती .परंतू पोलिसांच्या सहकार्याने वाहतुक सुरळीत करण्यात आली.अग्निशामकची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आणन्यात आली.

No comments:

Post a Comment