कंदलगाव - प्रतिनिधी ,
जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता लॉक डाऊन शिवाय पर्याय नसल्याने जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णया नुसार गावच्या संपूर्ण हद्दी बंद करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत .
या आदेशा नुसार ग्राम पंचायत प्रशासनाने गावातील माजी सैनिकांना एकत्र करून त्यांच्या नियोजनाने गावात लॉक डाऊन सुरू केले .
देशाच्या सिमेवरील रक्षणाचा मोठा अनुभव असणाऱ्या माजी सैनिकांनी आपल्या पद्धतीने लॉक डाऊन करुन येणाऱ्या -जाणाऱ्यांची नोंद ठेऊन आवश्यक कामाशिवाय कोणालाही प्रवेश दिला नाही . तीन शिफ्टमध्ये हे लॉक डाऊन चालणार असून यासाठी रिटा . आर्मी ऑफिसर तुकाराम पाटील , बळवंत शिंदे , रंगराव पुंदिकर , सुनिल किल्लेदार , सागर टोपरे याचे सह रिटा . पोलिस आनंदा भोसले , वसंत पाटील यांचे सहकार्य लाभले आहे .
फोटो ओळ - कंदलगाव येथे दुसऱ्या टप्प्यात लॉक डाऊन सांभाळताना माजी सैनिक , सरपंच , डे .सरपंच , पोलिस , होमगार्ड व कर्मचारी .
No comments:
Post a Comment