Sunday, 26 April 2020

साके येथे गरीब , रेशनकार्ड नसलेल्याना धान्य वाटप - - मुश्रीफ फाउंडेशनचा उपक्रम : शेकडो कुटुंबाना आधार


साके प्रतिनिधी  ः सागर लोहार 

साके (ता कागल ) येथील रेशनकार्ड नसलेल्या तसेच विधवा, परितक्त्या, निराधार व जेष्ठ नागरिक अशा गरजू व गरीब    कुटुंबाना मोफत धान्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब तुरंबे होते . यावेळी  सी. बी. कांबळे, चंद्रकांत निऊंगरे,अशोक सातुसे, श्रीमती लक्ष्मीबाई शिपेकर, 
आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.  

यावेळी बाळासाहेब तुरंबे म्हणाले, 
देशात कल्पनाही नसलेल्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देश एकावेळी थांबणे हा जरी इतिहास असला तरी त्यामुळे झालेलं नुकसानही न भरून निघणारे आहे. परिणामी समाजातील गोरगरीब जनतेला हाताला काम नसल्याने त्यांचे जीवन जिकिरीचे बनले आहे. अशा गरजू गरीब कुटुंबाना ना. मुश्रीफ फाउंडेशन ने  नैतिक जबाबदारी स्वीकारून धान्यरूपी मदतिचा आधार देण्याचे काम  केल्याबद्दल नाम मुश्रीफ साहेब यांचे आभार मानले .
 
कार्यक्रमास तानाजी हरेल, मारूती शेंडे, डॉ. बाबुराव पाटील, शिदार्थ कांबळे ,  रावसो निऊंगरे ,दिपक ससे आदी उपस्थित होते.
फोटो
साके : येथे गरजू गरीब व उपेक्षितांना धन्यवाटप करताना बाळासाहेब तुरंबे , सी.बी .कांबळे, चंद्रकांत निऊंगरे आदी.    छाया- सागर लोहार, साके

No comments:

Post a Comment