साके प्रतिनिधी ः सागर लोहार
दरवर्षी निवडणुका,आचारसंहिता,महापुर आणि आता कोरोना यांचा फटका कोल्हापूर जिल्हयातील हजारो सोंगी भजन कलाकारांना बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलावंताच्या,हातावर पोट भरणा-या मजुरांच्या उत्पनात मोठी घट झाली आहे. यामुळे आपल्या कलेच्या जोरावर उपजिविका करणा-या अनेक सोंगी भजन कलावंतावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. साधारंतः एप्रिल ,मे,जून या कालावधीत लग्न सराई,यात्रा,उत्सव असतात. सर्व कलाकार या महिन्यांत समारंभात आपली कला सादर करून मिळेल त्या पैशावर उपजिवीका चालवतात. पंरतू यंदा सलग पाच महिने झालेला दमदार पाऊस,सर्वत्र आलेला महापुर व आता जगभरात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. पुढील 3 /4 महिने तरी कोणते उत्सव .गैारी-गणपती आणि शारदीय नवरात्री उत्सव साजरा होईल की नाही याची शंका कलाकार मंडळींना वाटत आहे. गत साली गैारी-गणपती,दसरा,दिवाळी सण हा आतीवृर्ष्टीमुळे कार्यक्रमाविनाच घरी बसून वाया गेला आहे शिवाय यंदाच्या मिळगतीचा कालावधीतही कोरोनामुळे कार्यक्रम रद्द झाल्याने सोंगी भजन कलावंतावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनाचा संसर्ग हेऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी दैालत देसाई यांनी यात्रा,जत्रा व गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. कोरोनामुळे गेल्या शतकात प्रथमच सोंगी भजन कलाकांराना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यात जवळजवळ 1500 कलाकार आहेत ज्यांच्या उपजिविकेचे एकमात्र साधन हे सोंगी भजन हेच आहे. पण या जागतिक संकटामुळे सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातील बरेच कलाकार हे प्रत्येक वर्षी कोणतेही मानधन न घेता निराधार लोकांच्या मदतनिधीसाठी सोंगी भजन कार्यक्रम घेवून जमलेला सर्व निधी निराधारांना सुपुर्द करतात. त्यामुळे शासन ,लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था यांनी अशा सर्व कलाकारांना या संकट समयी आर्थिक मदतीचा हात देवून मदत करावी अशी मागणी सोंगी भजन कलाकारांतून होत आहे.
लोककला जतन करण्यासाठी प्रामिणपणे प्रयत्न करणा-या सोंगी भजन कलाकारांच्या उदरनिर्वाहासाठी शासन स्तरावर उपजिविकेसाठी मोफत धान्य व आर्थिक मदत मानधनस्वरूपात देवून सहकार्य करावे.
सचिन लोहार -
( निर्माते दिगर्दशक - आधुनिक सोंगी भजन सावर्डे बुद्रुक )
लोककलाकारांचा हंगाम बुडाला.....
जानेवारी ते एप्रिल ह्या कालावधीत सण यात्रा उत्सव साजरो होतात त्यामुळे दरवर्षी सोंगी भजन कलाकारांसाठी हा सुगीचा हंगाम असतो पण यंदा कोरोनामुळे हा मिळगतीचा असणारा लोककलाकारांचा हंगामच कार्यक्रम रद्द झाल्याने पुडाला असल्याने अनेक कलाकरांनी सहा महिने केलेली प्रॅक्टीस वाया गेली शिवाय कलाकारांना दिलेली अॅडव्हॅान्सही बुडाली आहे.
No comments:
Post a Comment