MH9 LIVE NEWS. सध्या कोरोना विषाणू मुळे अर्थ व्यवस्था पार कोलमडून गेली आहे . इथून पुढे जो कष्ट करेल उद्योग धंदा करेल तोच टिकून राहील . म्हणूनच आज साधा आणि सोपा उद्योग मार्ग आपल्याला दाखवत आहोत. आपल्याला खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करण्याची आवड असेल किंवा तुमच्याकडे व्यवस्थापन कौशल्य असेल तर तुम्ही उत्तम खाद्यपदार्थ व्यावसायिक बनू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता लागत नाही. तुमच्याकडे अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य असले पाहिजे. सुरुवातीला अगदी आसपासच्या घर आणि ऑफिसमध्ये, हॉस्पिटल मध्ये डबे देण्याच्या व्यवसायापासून तुम्हाला सुरुवात करता येऊ शकेल. डबे देण्याच्या व्यवसायातून तुम्हाला किती लोकांसाठी किती अन्नपदार्थ लागतात, त्यासाठी साहित्य किती लागते याचा अंदाज येऊ शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थांची चव कशी असावी याचाही अंदाज डबे पोहोचवण्याच्या व्यवसायातून येऊ शकतो.
याामध्ये जर इंटरेस्ट नसेल आणि एखाद्या पदार्थात तुमची स्पेशालिटी असेल उदाहरणार्थ बिर्याणी, मिसळ, पावभाजी किंवा पंजाबी डिशेस तर तुम्ही घरातूनच हा व्यवसाय सुरू करून पैसे मिळवु शकता.
या व्यवसायााला तुम्ही सोशल मिडियावर मोफत जाहिरात करून भरपूर वाढवू शकता. महत्त्वाचे म्हणजे तुमचा पदार्थ एकबार खाओगे तो बारबार खाओगे असा असायलाच हवा. तुम्हाला यामध्ये टेक अवे किंवा होम डिलिव्हरी असे पर्याय ठेवता येईल. याही पुुढे जाऊन तुम्ही होम किचनचे फुड सेफ्टी लायसन्स काढून रितसर व्यवसाय सुरू करू शकता. अशा लायसन्स धारकांना ZOMATO आणि SWIGGY वरुन भरपूर अॉर्डर मिळतात आणि खरोखरच टेस्टी पदार्थ असेल तर दिवसभरात हजारो रुुपयांची कमाई करु शकता. आम्ही फक्त मार्ग दाखवला आहे उद्योग तर तुम्हालाच करायचा आहे त्यासाठी आपल्या परिसरात काय चालेल याचा प्राथमिक सर्वे करणे फार आवश्यक आहे. कसा वाटला हा लेेख ? आवडला असेल तर जरुर शेअर करा आणि एखाद्या गरजूला उद्योगाची संंधी उपलब्ध करून द्या.
No comments:
Post a Comment