Friday, 24 April 2020

लॉकडाऊन मध्ये अनोळखी युवकास पकडले

प्रमोद झिले
येरला:- संपुर्ण देशात कोरोनाचे थैमान असताना आणि सगळीकडे लाकडाउन असताना एक अनोळ खी व्यक्ती पोलिसांना गुंगारा देत 10 ते 12 दिवसापासुन रात्री12 ते 1 वाजताचे दरम्यान येरला या गावामध्ये येत होता.शेवटी गावकर्याच्या मदतीने त्या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, वड्नेर पो. स्टे. अन्तर्गत येत असलेल्या येरला या गावामध्ये एक अनोळखी तरुण दररोज 10 ते 12 दिवसपासुंन रात्री 12 ते 1वाजताचे दरम्यान गावामध्ये यायचा व पहाटे वापस जायचा ही बाब काही नागरीकांच्या लक्षात आली.एक दोन वेळा हटकले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. 
गावातील लोकाना प्रश्न पड्ला की , हा व्यक्ती कोण आहे, कुठून येते, आणि कुठे जाते .याबाबतची सुचना वड्नेर पो.स्टे.ला देण्यात आली.
  ता.23 ला नेहमीप्रमाणे 12 ते 12.30 वाजताचे दरम्यान एक व्यक्ती आली असता पहिलेच पाळत ठेवून असलेल्या गावकर्यानी त्याला पकडले व वड्नेर पो.स्टे.ला फोन करुन सुचना केली.त्याचे जवळ MH-31-DQ-6816 क्रमांकाची दुचाकी आढळून आली.
  यावेळेस  वड्नेर पो.स्टे.चे मसराम , बीट जमादार पाटील ,गावातील उपसरपंच मेघेश्याम झिले, जयंत कातरकर आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment