Friday, 24 April 2020

प्रतिष्ठीत नागरिकांकडून गांधीनगर पोलिसांचा सत्कार


गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे

Covid-19 अर्थात कोरोना या आजाराने भारतासह जगभर थैमान घातले आहे.देशामध्ये लाँकडाऊन होऊन महिना होऊन अधिक काळ झाला तरी या आणीबाणीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासन कोरोना संसर्गाचा धोका पत्करत घेत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखत असतानाच गांधीनगर गडमुडशिंगी उंचगाव या गावातील अनेक गोरगरीब शेतमजूर व परप्रांतीय मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. अशावेळी अशा घटकांची उपासमार होऊ नये यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी गोरगरिबांना धान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.गांधीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर  व पोलिस उपनिरीक्षक अतुल कदम व सर्व स्टाफ यांनी अशा परिस्थितीत  सामाजिक भान राखत या भागातील नागरिक,परप्रांतिय,गोरगरिब,उपाशी राहू नयेत म्हणून दानशूर व्यक्ती,संस्था,व संघटना,व सिंधी बांधवाच्या मदतीने जिवनावश्यक वस्तू व अन्नाचा पुरवठा करीत आहेत. वर्दीतील माणुसकीचा उचित सन्मान होण्याच्या हेतूने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांचे मनोधेर्य वाढविणेचे काम करवीरचे माजी उपसभापती व पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी,मुडशिंगीचे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस चे करवीर तालुकाध्यक्ष आप्पासो धनवडे,युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कांबळे,पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाउपाध्यक्ष रतन कांबळे व उद्योजक निरंकारी गोपालदास यांनी केले.
या सत्काराला उत्तर देताना दीपक भांडवलकर  यांनी या संस्कारामुळे आणखी काम करण्याची ऊर्जा मिळाली व जनतेनेही सहकार्याची भुमिका घेवून शासकीय सुचनांचे पालन करून घरीच थांबून कोरोना थोपवण्याचे काम करूया असे मनोगत व्यक्त केले . यावेळी गांधीनगर, गडमुडशिंगी, उंचगाव परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment