Friday, 24 April 2020

कोरोना पार्श्वभूमीवर जि.प.अध्यक्षांची हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी


उदगीर:-गणेश मुंडे 
 कोरोना विषाणूच्या वाढत असलेल्या संसर्गाला रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य विभाग सज्ज आहे का..?  ही पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांनी हेर ता. उदगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट दिली.यावेळी दवाखान्यात सर्व सुविधा व कर्मचारी वर्ग सतर्क व आरोग्यसेवा देण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना उपचार सुविधा चांगल्या व समाधानकारक मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे सध्या प्रत्येक गावात शहरातून आलेल्या नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा सर्वांची तपासणी केली जात आहे सध्यातरी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला एकही रुग्ण हेर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दिसून आलेला नाही तरीही आरोग्य विभागाने घेतलेली सकारात्मक भूमिका बजावत असलेले कर्तव्य निश्चितपणे प्रशंसनीय आहे असे  राहुल केंद्रे म्हणाले यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद माजी सभापती बापूराव राठोड, बाबासाहेब पाटील,दिलीप बिरादार,भागवत गुरमे,बालाजी गुराळे सागर बिरादार,हेरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी वाघमारे डॉक्टर संजय सांडोळकर तालुका आरोग्य अधिकारी,यांच्यासह आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी तसेच ग्राम विकास अधिकारी बाबाराव मुसळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment