उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
कोरोना व्हॉयरस वर पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागातील प्रशासन सज्ज झाले आहे,त्यात काही अडचण होऊ नये म्हणून ग्रामीण भागात गावपातळीवर संबंधित ग्राम पंचायत ने ॲंन्टी कोरोना फोर्स ची निवड केली आहे जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळला नसल्याने तसेच बाहेर गावाहून येनार्यांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे लोक हे छुप्या मार्गाने येण्यासाठी ग्रामीण भागातील पांनंद रस्ते,शिव रस्ते, व जास्त करून रात्री चा वेळी जात येत असल्याने कदाचित भविष्यात आपल्या जिल्ह्यात या रोगाचा प्रसार होऊनये म्हणून गाव पातळीवर गावातील युवकांनी गावातील साधारण २० युवक यात सहभाग नोंदविला आहे, व हे युवक आपल्या गावासाठी दिवस रात्र जागरूक राहात आहेत युवकांचे व ग्रामपंचायत चे नियोजन कौतुकास्पद केले आहे, याच बरोबर होणीहिप्परगा ते उदगीर या दोन मार्गावर फाटक बसवण्यात आले आहेत, या २० स्वयंसेवकावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी सरपंच लक्षम वसराम जाधव, उपसरपंच शेषेराव धोंडीबा गायकवाड, गायकवाड साधना रोहिदास ग्रामसेवक, सर्व सदस्य, व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, व या सर्व स्वयंसेवकांना टि शर्ट,मास्क,सॅनिटायझर, व बॅटरी चे वाटप ग्रामसेवक सरपंच इत्यादी च्या हस्ते वाटप करण्यात आले
No comments:
Post a Comment