Saturday, 25 April 2020

भटक्या जनावरांसाठी अॅनिमल अॅम्ब्युलन्स देणार- पालकमंत्री सतेज पाटील


कोल्हापूर ता २१:- शहरातील भटक्या कुत्र्यांना नियंत्रणात आणण्यासाठी डीपीडीसीतून लवकरच अॅनिमल अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देऊ, तर मोकाट जनावरांसाठी कायमचा निवारा करण्यासाठी महापालिकेचा पन्नास लाख निधी उपलब्ध आहे. आणखी निधीची गरज भासल्यास उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 

कोरोनाच्या संकटामुळे शहरात लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण होत आहे. या भटक्या जनावरांच्या अन्नाचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. यावर उपाययोजना करण्यासाठी शहरातील भटक्या जनावरांवर नियंत्रण करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पशुसंवर्धन उपसंचालक, मनपा आयुक्त, मनपा आरोग्य अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी आणि विविध एनजीओ यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी विविध एनजीओच्या प्रतिनिधींनी शहरातील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याचे काम आपण पार पाडू, यासाठी शहरातील भाग हा विभागून घेऊन या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालू असे सांगितले. यानंतर झालेल्या चर्चेनंतर शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांची संख्या मोजून त्यांच्या गळ्यामध्ये बेल्ट घालणे,  त्याचबरोबर या कुत्र्यांपासून उपद्रव होऊ नये म्हणून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी या भटक्या जनावरांसाठी डीपीडीसीतून लवकरच अॅनिमल अॅम्ब्युलन्स  उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे सांगितले. 

No comments:

Post a Comment