Friday, 24 April 2020

एअर इंडियाच्या तिकीट विक्रीला ३१ मे पर्यंत स्थगिती


गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
ता.२४
डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन (डीजीसीए) या केंद्र सरकारच्या विमान वाहतूक नियंत्रण संस्थेच्या सूचनेनुसार सर्वच विमान कंपन्यांना सध्या कोणत्याही ही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानांच्या प्रवासाचे बुकिंग घेण्यास बंदी घातली असून त्यानुसार
भारत सरकारचे स्वामित्व असलेली विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाने जगभरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपली देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवा ३१ मे पर्यंत स्थगित केली असून हवाई वाहतूक सेवेचे तिकीट बुकिंग ही ३ मे पर्यंत स्थगित केले आहे. त्याच बरोबर एअर इंडियाने आपली सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे ३१ मे पर्यंत स्थगित केली असल्यामुळे त्याचीही तिकीट विक्री सध्या बंद केली असल्याचे एअर इंडिया च्या संकेतस्थळावर सूचित करण्यात आले आहे. याच बरोबर सर्व नागरिकांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरीच रहा व सुरक्षित रहा असा संदेश देण्यात आला आहे. परंतु दरम्यानच्या काळात विमानसेवा सुरू करणे व स्थगित करण्यासंदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन परिस्थिती नुसार निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment