खासदार संजय काका पाटील यांच्या सुचनेनुसार आगळगाव-जाखापूर उपसा सिंचन योजनेच्या नलिका वितरण प्रणालीमधील शेळकेवाडी वितरिकेच्या कामांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे शेळकेवाडी आणि आगळगाव येथील ३१० हेक्टर शेतीला त्याचा लाभ होणार आहे. आगळगाव जाखापूर उपसा सिंचन योजनेतील शेळकेवाडी वितरिकेची एकूण लांबी ४५६५ मीटर असून त्यापैकी २६५० मीटरच्या वितरीकेचे टेस्टिंग पूर्ण झाले आहे.
आगळगाव-जाखापूर सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करुन कवठेमहांकाळ तालुक्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.
या वितरिकेच्या चाचणीवेळी सहायक अभियंता श्रेणी १ अश्विनकुमार कर्णाळे , म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २ सांगलीचे कार्यकारी अभियंता विजय पाटील आणि जलसंपदा विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment