▼
Friday, 24 April 2020
जादा दराने किराणा व जीवनावश्यक वस्तूंची विक्री केल्यास होणार परवाना रद्द आणि फौजदारी गुन्हा
कोल्हापूर प्रतिनिधी. कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. अनेक दुकानदार लॉकडाऊनचा फायदा घेऊन जादा दराने विक्री करत आहेत अशा तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावर जिल्हापुरवठाधिकारी यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिले आहेत त्या प्रमाणेच वस्तूंचे भाव ठेवून विक्री केली पाहिजे अन्यथा जादा दराने विक्री केल्यास विक्रेत्याचा परवाना रद्दची कारवाई आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सोबत वस्तूंचे भाव दिले आहेत. अशा प्रकारे कोणीही विक्रेता जादा दराने जीीवनावश्यक वस्तू विकताना आढळून आला तर तक्रार करावी.
No comments:
Post a Comment