Friday, 24 April 2020

आ. चंद्रकांत जाधव यांच्याकडून पंधरा हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उदघाटन

प्रतिनिधी - संदिप पोवार 
१५ हजार कुटुंबांना आमदारांकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, सतेज पाटील यांच्या हस्ते उदघाटन...
आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून १५ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाची आज सुरवात झाली.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील उत्तर मतदारसंघातील कुटुंबांना अशी मदत दिली जाणार आहे. पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गव्हाचे वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, दोन टप्प्यात मदत करण्यात येणाऱ्या या उपक्रमाची येथील जिव्हेश्वर हॉल येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सामाजिक अंतर ठेवून सुरवात करण्यात आली.  
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने, नगरसेवक संभाजी जाधव, नगरसेवक सचिन पाटील, राजू लाटकर, उद्योजक उदय दुधाणे, संपतराव पाटील, किरण मेथे, संग्राम गायकवाड, दुर्गेश लिंग्रेस, किशोर खानविलकर, स्वप्नील साळोखे, कमलाकर जगदाळे, संभाजी पोवार आदी उपस्थित होते. अन्नधान्य पॅकिंग व त्याच्या वितरणाची पूर्ण जबाबदारी दीपक चोरगे आणि त्यांचे सहकारी सांभाळत आहेत.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्यात येत आहे. जिल्ह्यात पालकमंत्री सतेज पाटील सर्वांशी समन्वय ठेवून आहेत. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातूनही सर्वांना वस्तूंचा पुरवठा करीत आहोत. मात्र यातूनही मदत न मिळालेल्या शेवटच्या घटकापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोच करीत आहोत.    

No comments:

Post a Comment