लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही व्यवसायाला अथवा दुकानाला आपला व्यवसाय करण्यास बंदी असल्याने असे व्यवसाईक गेल्या दिड महिण्यापासून घरातच तळ ठोकून आहेत .
त्यातच संचारबंदी असल्याने घरातून बाहेरही पडता येत नाही . आशा वेळी सकाळी अथवा सायंकाळी थोडे पाय मोकळे करावे म्हटले तर पोलिस कारवाईची भिती . मग काय रात्रभर झोपायचे आणि दिवसभरही झोपायचेच आशा झोपण्याने पुन्हा तब्बेची काळजी वाढत असून मरगळ येणे , वजन वाढणे , हात - पाय दुखणे आशा आरोग्याच्या समस्या वाढत आहेत .
यासाठी काही वॉकर्सनी युक्ती शोधून माळावरचा मधला रस्ता धरून आपली मरगळ झटकण्याचा प्रयत्न सुरू आहे . मुख्य रस्त्यावर फिरायला गेल्यावर कारवाई होईल या भितीने मॉर्निग वॉकर्सनी आपले आरोग्य सुस्थितीत राखणेसाठीच हि मधली वाट धरली असल्याचे काहींनी बोलून दाखविले .
डॉक्टरांचा सल्ला ...
जेष्ठ नागरीक तसेच पॅरॅलिसिस च्या समस्या असणाऱ्या रुग्णांना रोजचा व्यायाम व थोडे चालणे गरजेचे असते .आशावेळी दोन -तीन दिवस व्यायाम केला नाही तर पुन्हा समस्या निर्माण होतात . आशा रुग्णांसाठी व जेष्ठांसाठी रोजचा व्यायाम गरजेचा असतो . मात्र आपली काळजी घेऊन गर्दी न करता कायद्याच्या सुचनांचे पालण करणे गरजेचे आहे .
डॉ . मोहन शिर्के .
आयुर्वेदाचार्य .
फोटो - कारवाईचा बडगा टाळण्यासाठी मधल्या वाटेने वॉकींग करताना नागरीक ..
No comments:
Post a Comment