सध्याची परिस्थिती पाहता कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळा बंद आहे. विद्यार्थी घरीच आहेत. असे असले तरीही मुलांच्या शिक्षणाचे सातत्य कायम टिकवण्यासाठी,श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन त्यांचा वेळ वाया जाऊ नये,म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत. यामध्ये इंग्रजी,गणित आणि विज्ञान या विषयाचा सहभाग आहेत. यासाठी सर्वच विद्यार्थ्यांना या ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाचा लाभ होईल,यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत.असे आवाहन शामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती पंडित यांनी केले आहे.ऑनलाइन शिक्षण चालू करण्याच्या संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे. असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिकारी श्री औदुंबर उकिरडे यांनी केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत शामलाल विद्यालयाने शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचना प्रमाणे प्रत्येक तुकडीतील विद्यार्थ्यांची ग्रुप बनवून त्यांना ऑनलाइन पद्धतीची माहिती देत असतानाच, समाजात वावरताना सामाजिक दुरी ठेवून राहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर येऊ नये. अशाही सूचना दिल्या आहेत. या प्रक्रियेसाठी श्यामलाल स्मारक विद्यालयातील शिक्षक संजय देबडवार,आनंद चोबळे,सुधीर पुल्लागौर,राहुल नादरगे,सौ. वनमाला मुक्कावर, विष्णुकांत चेरेकर,राहुल लिमये, सतीश बिरादार,सचिन तिवारी,विक्रम मलकापुरे या शिक्षकांच्या सोबतच स्वयंस्फूर्तपणे उंटवाले आसमा मॅडम यांनी देखील श्यामलाल च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू केली आहे.या सर्व शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे अभिनंदन आणि कौतुक शामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुपोषपाणी आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर,सचिव अॅड.विक्रम संकाये, सहसचिव अंजुमनीताई आर्य यांनी केले आहे.पालकांतून देखील चांगला प्रतिसाद मिळत असून विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणचा आनंद उपभोगत आहेत.
No comments:
Post a Comment