Tuesday, 28 April 2020

१९वा, २०वा व २१वा दिवस गरजुंना अन्न वाटप.

१९वा, २०वा  व २१वा दिवस गरजुंना अन्न वाटप. 

अॅड अमोल कळसे 

उदगीर शहरातील सर्व हॉटेल व भोजनालय जे पार्सल देत होते ते कोरोना रुग्ण आढळल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांना, खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या बाहेर गावातील रुग्णांना व त्यांच्या सोबतच्यांना, शहराच्या नाकेबंदीसाठी थांबलेल्या पोलीस कर्मचारी व शहरात घर नसलेल्या शासकीय कर्मचारी यांची गैरसोय होईल त्याकरिता आठ दिवसांपासून बंद ठेवण्यात असलेला जनाग्र प्रतिष्ठान व नरेश सोनवणे यांचे अन्नछत्र परवा पासून पुन्हा सुरु करण्यात आले आहे. परवा, काल व आज अन्न वाटप करण्यात आले. 
सुरक्षेसाठी अन्न वाटप करणाऱ्या स्वयंसेवकांनी मास्क, विशेष चष्मा व हातमोजे चा वापर केला.
सदरील पोस्ट जिल्हाधिकारी लातूर परीपत्रक क्र.२०२०/आ.व्या./कावि-३३३३ दि.११/०४/२०२० च्या परिपत्रकामधील कुठल्याही नियमांचे उल्लंघन न करता करण्यात येत आहे. 
तरी गरजूनी संपर्क साधावा
९८२३३३४४९७

No comments:

Post a Comment