Tuesday, 28 April 2020

दिलासा : त्या पाचही जणांचे रिपोर्ट निगेटिव्हप्रशासनासह जिल्ह्यावासीयांनाही मिळाला दिलासा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांची माहिती

दिलासा :  त्या पाचही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

प्रशासनासह जिल्ह्यावासीयांनाही मिळाला दिलासा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांची माहिती

वाशिम (m आरिफ पोपटे ) दि.२८ - अमरावती येथील रहिवासी असलेले व कामरगांव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले कोरोना संसर्गीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या त्या ५ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. हृषीकेश मोडक यांनी दिली आहे. यामुळे वाशिम जिल्हा हा आजमितीला कोरोनामुक्त असल्याचा दिलासा वाशिम जिल्ह्यातील जनतेला मिळाला आहे.  

अमरावती जिल्ह्यात राहणार्‍या व कामरगांव येथील एका शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेली व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह निघाली. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. माहिती मिळताच कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील व धनज बु. पो.स्टे. चे ठाणेदार सोमनाथ जाधव व आरोग्य अधिकारी यांनी कामरगांव गाठून त्याचे संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेतली. सदरहू मुख्याध्यापक हे २ एप्रील रोजी शाळेय पोषण आहाराचे धान्य वाटपासाठी कामरगांव येथे आले होेते. तेव्हा त्यांचे संपर्कात कोण कोण होते याची सखोल माहिती घेण्यात आली होती. व त्यानंतर त्याचे ३ सहकारी शिक्षक वृंद, खिचडी शिजविणारी व्यक्ती व १ इतर असे ५ जणांना वाशिम येथे हलविण्यात येऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. काल त्यांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट आज निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह जिल्ह्यातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. 

आजरोजीची जिल्ह्याची जिल्हा आरोग्य विभागाचे वतीने देण्यात आलेली स्थिती पुढील प्रमाणे आहे 

एकुण संख्या - ८०, गृह विलगीकरणात २७, संस्थात्मक विलगीकरणात २७, स्व्ब नमुने घेतल्यांची संख्या ४६, निगेटीव्ह ४५, उपचारानंतर बरे झालेल्यांची संख्या - ०१ 

No comments:

Post a Comment