▼
Saturday, 25 April 2020
बावड्यातील कुटुंबाने जपली सामाजिक बांधिलकी - वाढदिवसाच्या निमित्ताने सफाई कर्मचार्यांचा सत्कार
कसबा बावडा प्रतिनिधी संदिप पोवार सध्या कोरोना मुळे लोक हैराण झाले आहेत तरीही आरोग्य सेवक व सफाई कर्मचारी मात्र. अविरत कार्यरत आहेत. अशा लोकांचा सन्मान होण्यासाठी बावड्यातील एका कुुुटुंबाने वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपली आहे. प्रांजली दिपक पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त पाडळकर काॅलनी येथील घंटागाडीतील कचरा निर्मूलन करणारे श्री.अशोक मारूती भालकर व श्री.विजय गोविंद डोंगळे यांचा सत्कार कु.प्रांजल हिच्या हस्ते करण्यात आला. त्यानिमित्य प्रत्येकी दोन सॅनिटायझर,मास्क, फेटे, शर्टपीस,टाॅवेल,श्रीफळ देण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. याा घरगुती कार्यक्रमास दिपक पाटील, प्रांजल पाटील, प्रथमेश पाटील, सौं.अलका पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment