Saturday, 25 April 2020

उदगीर येथील कोरोना पॉझिटिव महिलेचा मृत्यू !


अॅड अमोल कळसे 

 उदगीर : येथील  उपजिल्हा रुग्णालयात दि. 23 एप्रिल 2020 रोजी अत्यावश्यक अवस्थेत एक 70 वर्षीय महिला रुग्ण दाखल झालेली होती. या दाखल झालेल्या 70 वर्षीय महिलेचा कोरोना स्वाब रिपोर्ट आज दुपारी पॉझिटिव आलेला होता. तसेच या महिला रुग्णास मधुमेह व रक्तदाब आजार होते व त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी या कोरोना पॉझिटिव महिलेचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली आहे. 
उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल कोरोनाबाधित एका ७० वर्षीय महिलेचा शनिवारी (ता.२५) दुपारी मृत्यू झाला. यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून महिलेचे वास्तव्य असलेल्या तीन किलोमीटर त्रिज्या क्षेत्रात परिसर सील करण्यात येणार आहे. सकाळीच या महिलेच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महिलेच्या मृत्यूनंतर या महिलेला कोरोनाची लागण झालीच कशी आणि ही महिला कोणाकोणाच्या संपर्कात आली, याची सखोल चौकशी प्रशासनाने सुरू केली आहे.

No comments:

Post a Comment