Saturday, 25 April 2020

N 95 मास्क म्हणजे नेमके काय ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण बरेच वेळा N 95 हा शब्द सतत ऐकत आहोत. आज जाणून घ्या नेमका काय मास्क आहे हा.  कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांनाच सध्या सक्तीनं N-95 मास्क वापरण्याची गरज आहे. सामान्य माणसाला साधा मास्क किंवा रुमाल चालतो. N95 चं प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो. N-95 मास्कमध्ये एकूण पाच कापडी लेअर (स्तर) असतात. यात न चिकटणारे कापड आणि फिल्टर कापड यांचेही अनेक लेअर (स्तर) वापरलेले असतात. या N-95 चं एक वैशिष्ट्य हे सुद्धा आहे की हा संपूर्ण पॅक बसतो लिकेज होत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा श्वास घेता त्यावेळी याच्या कोणत्याही कोपऱ्यातून हवा आता प्रवेश करु शकत नाही. ज्यामुळे 95% दूषित कणांपासून तुमचं संरक्षण होतं. म्हणजेच आरोग्य कर्मचारी म्हणजेच डॉक्टर्स, नर्स इत्यादींना या मास्कची अत्यावश्यकता असते कारण ते सतत रुग्णांच्या संपर्कात असतात. महत्त्वाचे म्हणजे या मास्कला कधीही हात लावायचा नसतो तर त्याच्या दोरीलाच हात लावून बांधला किंवा काढला पाहिजे. आता शेवटचा प्रश्न हा धुवून पुन्हा वापरता येईल का तर अजिबात नाही. N95 मास्क हा सिंगल युज डिस्पोजेबल प्रकारात मोडतो, WHO नूसार  असा मास्क जास्तीत जास्त फक्त 8 तासच वापरणे योग्य ठरते. आणि हो  N 95 च्या भरपूर कॉपी मार्केट पहायला मिळतात यामध्ये भरपूर बनावट असतात, यावरचा शिक्का पाहूनच ओरिजिनल का डुप्लिकेट हे ठरवता येईल. 

1 comment: