सुमारे वीस ते पंचवीस वर्षापासून वाढत्या लोकवस्तीमुळे पुरवठा होणाऱ्या पाण्याची कमतरता भासत असून वारंवार मागणी करूनही निधीअभावी आहे ते पाणी पूरवून प्यावे लागत आहे .
गांधीनगर प्रादेशिक योजनेतून पुरवठा होणाऱ्या १४ गावापैकी मोरेवाडी व पाचगाव परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वारंवार होणाऱ्या पाईप गळतीमुळे पाण्याची कमतरता जाणवत असून मुळ मागणीपेक्षा पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे .
उजळाईवाडी वैभव टेकडी ते शांतीनिकेतन परिसरात गेल्या पाच वर्षात अनेकदा गळती लागली असून लागलेली गळती काढणेसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत . पण हि गळती जलवाहिनी बदलणेचा विचार कधीही संबधीत विभागाकडून झाला नाही . या गळतीमुळे परिसराला पाणी कमी दाबाने मिळत असून भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण होत आहे .
" संबधीत विभागाला नविन पाईप टाकणे बाबत पत्रव्यवहार झाला असून येत्या सोमवारी नवीन पाईप टाकणेचे काम सुरू होईल .
रामदास मोरे .सरपंच मोरेवाडी
दत्तात्रय भलुगडे . ग्रा.प. सदस्य
फोटो - मोरेवाडी शांतीनिकेतन शेजारी २५० मी . मी . व्यासाच्या पाईपची गळती काढताना कर्मचारी .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )
No comments:
Post a Comment