Saturday, 25 April 2020

mh9 NEWS

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला गळतीचा भार सोसेना .गळतीवर झाला लाखोत खर्च ...


कंदलगाव - प्रकाश पाटील .
    सुमारे वीस ते पंचवीस वर्षापासून वाढत्या लोकवस्तीमुळे पुरवठा होणाऱ्या पाण्याची कमतरता भासत असून वारंवार मागणी करूनही निधीअभावी आहे ते पाणी पूरवून प्यावे लागत आहे .
      गांधीनगर प्रादेशिक योजनेतून पुरवठा होणाऱ्या १४ गावापैकी मोरेवाडी व पाचगाव परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वारंवार होणाऱ्या पाईप गळतीमुळे पाण्याची कमतरता जाणवत असून मुळ मागणीपेक्षा पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे .
      उजळाईवाडी वैभव टेकडी ते शांतीनिकेतन परिसरात गेल्या पाच वर्षात अनेकदा गळती लागली असून लागलेली गळती काढणेसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत . पण हि गळती जलवाहिनी बदलणेचा विचार कधीही संबधीत विभागाकडून झाला नाही . या गळतीमुळे परिसराला पाणी कमी दाबाने मिळत असून भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण होत आहे .
     " संबधीत विभागाला नविन पाईप टाकणे बाबत पत्रव्यवहार झाला असून येत्या सोमवारी नवीन पाईप टाकणेचे काम सुरू होईल .
रामदास मोरे .सरपंच मोरेवाडी
दत्तात्रय भलुगडे . ग्रा.प. सदस्य
फोटो  - मोरेवाडी शांतीनिकेतन शेजारी २५० मी . मी . व्यासाच्या पाईपची गळती काढताना कर्मचारी .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :