कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश व राज्य लॉकडाऊन करण्यात आला आहे.अशा या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये गावातील गरीब शेतमजूर बांधकाम कामगार व दिव्यांग- निराधार कुटूंबाचे हातावर पोट असलेल्यांचे उपासमार होऊन फारच हाल होत आहेत. या प्राप्त परिस्थितीची गंभीर दखल घेऊन प्रमोद झिंजाडे अध्यक्ष महात्मा फुले समाजिक सेवा मंडळ, करमाळा यांच्या प्रयत्नाने सीड्स इंडिया, नवी दिल्ली या संस्थेच्या द्वारे मदतीचा आधार व सामाजिक बांधिलकी म्हणून जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येकी तांदूळ 5 किलो, गहू अठा 10 किलो, साखर 1 किलो, मसूर डाळ 1 किलो, तूर डाळ 1 किलो, येशल तेल 1 किलो, मिठ 1 किलो इत्यादी राशन वस्तूचे किट वितरण गावचे लोकनियुक्त सरपंच सौ.वंदना हरिचंद्र कांबळे व आरोग्य सेविका मॅडम सौ.वाय. एम.खान यांच्या हस्ते करण्यात आले.
आज संकटाच्या काळात एक आधारवड म्हणून ऑगस्ट 2019 महापुरात ही व आता कोरणा या महामारी आपत्ती काळात ही आमच्या गरीब कष्टकरी शेतमजूर यांच्या पाठीशी उभे राहून प्रमोद झिंजाडे यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून जी मदत केली आहे ती मदत अनमोल आहे. आम्ही ग्रामस्थांसह समाजबांधव व त्यांचा सदैव ऋणी असून त्यांनी सिडस इंडिया, नवी दिल्ली द्वारे केलेली जीवनावश्यक मदत आम्ही गावकरी कधीही विसरू शकणार नाही. अशी गौरवउदगार समाजभूषण हरिचंद्र कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी सोशल डिस्टन्स चा नियम पाळून संस्थेचे प्रतिनिधी नितीन कांबळे, ग्रा. प.सदस्य शहानुर गवंडी, संजय तिप्पान्नावर यांच्यासह आशा व अंगणवाडी सेविका व संगमित्र सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार संस्थेचे प्रतिनिधी शिवाजी कांबळे यांनी मानले.