बाजारगाव (प्रतिनिधी )
गजेंद्र डोंगरे
कोरोनाव्हायरस मुळे सगळीकडे भीतीचे वातावरण असून सर्वात जास्त भीतीचे वातावरण ग्रामीण भागात दिसून येत आहे अशीच परिस्थिती नागपूर जिल्यातील बाजारगाव येथे दिसून आली या गावात जाण्या-येण्यासाठी प्रमुख तीन मार्ग आहे या मार्गावर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले असून गेट लावण्यात आले आहे ग्रामपंचायत बाजारगाव यांच्याकडून हे लॉक डाऊन करण्यात आले असल्याचे येथील सरपंच तुषार चौधरी यांनी MH9 LIVE NEWS च्या प्रतिनिधी ला माहिती दिली परिसरात आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कारखाने ,रिसोड ,हॉटेल असून येथे काम करणारे मोठ्या प्रमाणात कामगार बाजारगाव येथे रूम करून राहतात येथे बँक असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक येथे मोठ्या प्रमाणात येने जाणे सुरू राहतात व गावातील काही नागरिक नागपूर येथे कामानिमित्त दूध घेऊन, किराणा सामानासाठी ,भाजीपाला साठी ये जार्या करतात म्हणून गावाच्या प्रवेश द्वारासमोर ग्रामपंचायत कडुन चौकीदार ठेवण्यात आले असून त्यांच्याजवळ एक बुक दिले आहे बाहेरून आलेल्या वाहनावर व व्यक्तीवर या सँनी टायझरची फवारणी करून विचारपूस करून आत प्रवेश दिला जात असल्याचे चित्र दिसुन आले यावेळी गेटवर असलेल्या व्यक्ती ला विचारले असता त्यांनी सांगितले की कोरोणा व्हायरस नागपूर मध्ये जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे येथील सरपंच तुषार चौधरी यांनी आम्हाला प्रवेश द्वारावर ठेवून आत मध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्ती चे नाव व त्यांच्या वर सँनि टायझरची फवारणी करूनच प्रवेश द्यावे असे सांगितले तसेच ह्या स्तुत्य उपक्रमाची परिसरात चर्चा आहे.