गांधीनगर : प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
गडमुडशिंगी तालुका करवीर येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपारिक जयंतीकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी सुरू असलेल्या लॉक डाऊन च्या नियमांचे पालन करीत मोठा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व शिवभक्तांनी घरोघरी शिव प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण गावातील नागरिकांनी छत्रपती शिवरायांना वंदन केले.
गडमुडशिंगी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सरपंच (प्र.)व उपसरपंच तानाजी पाटील व माजी सरपंच कविता संजय सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पंडितराव पाटील, संजय सातपुते व अमित माळी यांनी पुतळ्याचे पूजन केले.
शाहूनगर वसाहतीमध्ये जय मल्हार हमाल संघटना व जन युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीनिमित्त वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबविला. हमाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप थोरात यांनी घरोघरी जाऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. देशावर आलेल्या कोरोनाच्या महाभयंकर आजाराला परतवून लावण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करा, अशी जनजागृती जनयूथ फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल ढेरे यांनी घरोघरी केली. वृक्षसंवर्धन उपक्रमात गुंडा वायदंडे, महेश पवार, निलेश शिंदे, अनिकेत कांबळे, प्रशांत शिंदे सुमित कांबळे, सिद्धार्थ कांबळे सहभागी झाले.
दरम्यान, वळीवडे येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास सरपंच अनिल पंढरे, उपसरपंच अनिता खांडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. चिंचवाड येथे सरपंच सुदर्शन उपाध्ये व उपसरपंच कोळी यांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
....फोटो
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना सरपंच (प्र.) व उपसरपंच तानाजी पाटील माजी सरपंच कविता सातपुते, पंडितराव पाटील, , गितेश डकरे व अमित माळी.