शिगाव: वाळवा तालुक्यातील कामेरी व कासेगाव येथील कृष्णा कारखाना कराडमध्ये असणाऱ्या दोन कर्मचारी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे व गावानजीक असणाऱ्या बावची गावामधील व्यक्ती कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे गावच्या सुरक्षतेसाठी शिगाव (ता. वाळवा) येथे सोमवार दि. २७ एप्रिल ते बुधवार दि. २९ एप्रिल रात्री १२ पर्यंत गाव पूर्णपणे कडकडीत बंद राहणार आहे. गावातील सर्व प्रमुख रस्ते पत्रा लावून बंद करण्यात आली आहेत. तसेच या दिवसात विनाकारण कोणी रस्त्यावर फिरताना दिसल्यास अथवा कोणीही दुकान सुरू ठेवल्यास त्यांच्यावर कडक फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. गावामध्ये फक्त दूध व वैद्यकीय सेवा सुरू राहतील असे सरपंच उत्तम गावडे यांनी सांगितले.