उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
उदगीर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह 3 नवे रुग्ण
उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
उदगीर शहरात परवा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या आणि त्या प्रभागातील अनेकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी दिनांक 26 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 26 व्यक्तींच्या स्वॅब ची तपासणी करण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर यांच्याकडे नमुने पाठवण्यात आले होते. यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव आले आहेत. तर 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव आले असून दोन व्यक्तींच्या अहवालाचा इन कन्क्लूजन अशा पद्धतीचा रिमार्क आलेला आहे. त्यामुळे सदरील दोन व्यक्तींचा अहवाल पुन्हा 48 तासात नव्याने पाठवण्यात येणार आहे. उदगीर शहरात कोरोना मुळे मृत पावलेल्या महिलेच्या घराचा परिसर रेड झोन म्हणून सील करण्यात आला आहे.तसेच शहरात कर्फ्यू लावण्यात आला असून बंदोबस्त चांगलाच वाढविण्यात आला आहे.रुग्णालय आणि औषधी दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद आहेत.नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
या रेड झोन प्रभागाची पाहणी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, यांनी केली आहे.नागरिकांनी 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर येऊ नये. अत्यावश्यक सेवेची गरज भासल्यास नगरपालिका प्रशासनाची संपर्क करावा. असे आवाहन मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment