कंदलगाव - प्रकाश पाटील ,
रविवार दि .२१ मार्चपासून कोल्हापूर सह संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रसार थांबविणेसाठी प्रशासनाकडून संचारबंदि लागू करण्यात आली . तेंव्हापासून आज अखेर कंदलगाव ग्रामपंचायत व दक्षता समितीच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व रस्ते बंद करून या काळात गावातील सर्व नागरीकांची सुरक्षा केल्या बद्दल गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे , सौ . सुषमा शिंदे व शिंदे परिवाराकडून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .
लॉक डाऊन काळात गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार , शाळा , व इतर व्यवसाय बंद ठेवणेसाठी व गावात औषध फवारणी , आरोग्य सल्ला , तपासणी , जनजागृती करून नागरीकांना या संसर्ग रोगापासून दूर ठेवलेबद्द्ल ग्राम पंचायत सरपंच , उपसरपंच , सर्व सदस्य , कर्मचारी , दक्षता समिती , आरोग्य सेविका , आशा व अंगणवाडी सेविका , मदतणीस , गावचे पोलिस पाटील , पत्रकार , ग्रामसेवक , तलाठी , सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला .
प्रास्ताविक संजय शिंदे व सरदार मोहिते यांनी केले तर आभार चंद्रकांत अतिग्रे यांनी मानले .
फोटो - कंदलगाव येथे लॉक डाऊन काळात उल्लेखनिय कामगीरी केलेबद्दल सत्कार संपन्न झाला .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )
No comments:
Post a Comment