Tuesday, 28 April 2020

ग्रामीण भागात डिजिटल इंडियाची सुरुवात - खासदार साधणार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खासदार धैर्यशील माने साधणार संवाद

पन्हाळा तालुक्यातून गुरूवारी होणार सुरवात

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना व कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील विकासकामांना खीळ बसू नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत हातकणंगले लोकसभा मतदार संघातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनीधी यांच्याशी खासदार धैर्यशील माने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. या अभिनव उपक्रमाची सुरवात गुरूवारी दि. ३०/०४/२०२० रोजी पन्हाळा तालुक्यातून होणार आहे. यानंतर प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायत व नगरपालीकांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवला आहे.  त्यानंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील  प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा व लोकप्रतिनीधी यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याचा आढावा खासदार माने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. याची सुरवात गुरूवारी दि. ३०/०४/२०२० रोजी पन्हाळा तालुक्यापासून सुरवात करण्यात येणार आहेत. पन्हाळा तालुक्याचे तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याशी सकाळी आकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. यानंतर हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, वाळवा, शिराळा या मतदार संघातील सर्वच तालुक्यांची आढावा बैढक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काय उपाययोजना केल्या आहेत, लॉकडाऊनच्या काळात कोण-कोणती कामे करण्यास प्राधान्य देता येईल, आरोग्य यंत्रणा व आरोग्य विषयक सूचना, ग्रामीण विकासाबाबत धोरणात्मक व नियोजनबद्ध काम करण्याबाबतच्या महत्वपूर्ण सूचना, शेती व उद्योग, रेशन धान्य वितरण आदी विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार आहे. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सर्वं लोकप्रतिनिधीना स्वतःच्या घरातूनच सहभागी होता येणार असून, त्याबाबतचे मार्गदर्शक सूचना प्रशासनातर्फे देण्यात येणार असल्याचे खासदार माने यांनी सांगीतले.
---

ग्रामीण भागामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रशासन, लोकप्रतिनिधीशी चर्चा करण्याचा व आढावा बैठक घेण्याचा पहिलाच अभिनव उपक्रम खासदार धैर्यशील माने यांनी सुरू केला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये डिजीटल इंडीयाची सुरवात झाली असे म्हणता येईल. यापुढे प्रशासकीय व शासकीय बैठका, आढावा बैठका, जनतेशी संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment