Monday, 27 April 2020

कंदलगावच्या स्मशानभूमीत साकारला ऑक्सीजन पार्क .समाजवेध दक्षता समितीचा उपक्रम ...

कंदलगावच्या स्मशानभूमीत साकारला ऑक्सीजन पार्क .समाजवेध दक्षता समितीचा उपक्रम ...
कंदलगाव - प्रकाश पाटील ,
      " केल्याने होते रे आधी केलीचे पाहिजे " या म्हणीप्रमाणे आपल्या मनाने एखादे काम ठरविले की मग काहीही होऊ दे , ते पूर्ण केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही . असेच काम कंदलगावच्या एका साध्या बांधकाम व्यवसायीकांनी मनात घेतले आणि फोंड्या माळावर सहा वर्षातच पसरली हिरवळ ,
      येथील अशोक पुंदिकर यांनी सन २०१२ साली पाच रोपटी लाऊन माळावर असणाऱ्या स्मशानभूमीत येणाऱ्या पै- पाहूण्यांसाठी थोडीफार सावली असावी या हेतूने हा उपक्रम हाती घेतला .यासाठी त्यांना गावातील मारूती पाटील , विश्वास पुंदिकर यांची काही काळ साथ मिळाली .
 मात्र ती साथ फार काळ टिकली नाही . पण त्यांनी न खचता गावातील ओढ्या , विहिरीतून कावडीने पाणी घालून कशीबशी रोपे जगवीली .
     त्यांनी आपला उपक्रम असाच सुरू ठेवणेसाठी गावातील काही तरुणांना एकत्र करून सन २०१६ साली समाज वेध दक्षता समिती स्थापन करून त्या माध्यमातून गावात सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली .समितीमधील सर्वच सदस्यांनी त्यांना जीवाभावाची साथ देऊन स्मशानभूमीत अनेक रोपे लागवड करून त्या ठिकाणी ऑक्सीजन पार्क तयार करण्याचा मानस केला .
     त्यानुसार काम सुरू झाले व चार वर्षातच फोंड्या माळावर साकारला ऑक्सीजन पार्क  यासाठी त्यांना उत्तम यशवंत पाटील , शिवाजी सरनाईक , सचिन संकपाळ , अनिल सुतार , विलास कांबळे , कुमार पाटील , डॉ . मोहन शिर्के , प्रमोद खोत , अमित चव्हाण , मनोहर लोहार, संतोष निर्मळ  यांची मोलाची साथ मिळत आहे .
फोटो  - कंदलगाव स्मशानभूमीतील ऑक्सीजन पार्कमध्ये दक्षता समितीचे सदस्य .

No comments:

Post a Comment