पेठ वडगांव / वार्ताहर - नगरपालिका सर्व कर्मचा-यांचे आरोग्य विमा शासनाने सुरू करावा यासह विविध मागण्यासाठी सत्तावीस एप्रिल रोजी काळया फिती लावून आंदोलन करणार असल्याचे पालिका कर्मचारी यांनी ऑनलाइन प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
देशात कोरोनाचा फैलाव रोखण्याचे काम करणारे आरोग्य विभाग,ग्रामविकास कर्मचारी यांना धोका होऊ नये म्हणून विविध रकमेचा विमा उतरवला आहे. परंतू नगरविकास विभाग,नगरपालिका,नगरपंचायत मुख्याधिकारी व कर्मचारी यांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतलेला नाही.तसेच इतर विभागातील कर्मचारी यांना वैदयकीय खर्चाची प्रतिपूर्ती केली परंतु नगरपालिका कर्मचारी यांना वैदयकीय प्रतिपूर्तीचा लाभ दिला जात नाही.शासनाला याबाबत वेळोवेळी निवेदन दिले आहे परंतु दखल घेतली नसल्याने सत्तावीस एप्रिल रोजी काळया फिती लावून आंदोलन करण्यात येत असल्याचे ऑनलाइन दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे