कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीमधील महाराष्ट्राच्या सीमेवरती असणारे राजापूर धरण नेहमीच चर्चेत राहिले आहे या धरणामुळे शिरोळ तालुक्याला शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी एक वरदान लाभले आहे . परंतु प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये याठिकाणी पाण्याची दुर्गंधी व केंदाळ जलपर्णी यामुळे प्रदूषणाचा विषय नेहमीच चर्चेत राहत होता. कृष्णा नदी वरती असलेल्या या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला कृष्णा, वारणा ,पंचगंगा या प्रमुख नद्यांचा पाण्याचा स्त्रोत आहे. परंतु देशांमध्ये प्रदूषित नद्यांमधील समाविष्ट असलेल्या पंचगंगा नदी मुळे या ठिकाणचे पाणी नेहमीच प्रदूषित होत असते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण छोटे मोठे उद्योगधंदे बंद आहेत. पर्यायाने नदीमध्ये मिसळणारे रासायनिक युक्त पाणी थांबले आहे यामुळे पाण्यामध्ये असणारी जीवसृष्टी जिवंत राहिली असल्याने पाण्याचे प्रदूषण थांबले आहे. या नद्या प्रदूषण विरहित व्हाव्यात यासाठी आज अखेर राजकीय सामाजिक आंदोलने भरपूर झाली आहेत परंतु त्याचा कोणताच परिणाम जाणवला नव्हता. परंतु हे काम कोरोना या विषाणूने करून दाखवले आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. सध्या येथील पाणी इतके स्वच्छ आहे की त्या मध्ये प्रतिबिंब दिसत आहे.
No comments:
Post a Comment