▼
Wednesday, 22 April 2020
लॉकडाऊन आणि तळीरामांची गोची
‘मला काही अधिकार मिळाले तर, मी काम महत्वाचे करीन आणि ते म्हणजे दारू हद्दपार करीन’, असे महात्मा गांधी म्हणाले होते. त्यांच्या हयातीत ते झाले नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात देशभरात ब-याच अंशी दारुबंदी झाली. लॉॉकडाऊनच्या कााळा तळीरामांची फाारच गोची झाली आहे. दारुबंदी केली तर सरकारचे उत्पन्न बुडते. त्यामुळे सरकार दारूबंदी करण्यास फारसे उत्सुक नसते. एखाद्या राज्यात किंवा जिल्ह्यात दारुबंदी झाल्यास त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणावर दारुचा काळाबाजार होत असल्याचे चित्र आहे. दारू पिऊ नये, बाळगू नये आणि विकू नये असे कडक नियम असले तरी अंमलबजावणी व्यवस्थित नसल्याने, बंदीचा फज्जा उडाला आहे. महाराष्ट्रात दारुबंदी असलेल्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये जितकी सहज आणि मुबलक दारू मिळते, तेव्हढी इतरत्र कुठेही मिळत नसेल, हे वास्तव आहे. ‘दारूबंदी आवडे सर्वांना’ असे वाटत असल्यास कुणाला तरी पुढे यावे लागेल. कारण समाज दिवसेंदिवस दारूच्या आहारी चालला आहे. एकटा महाराष्ट्र दरवर्षी जवळपास ४० हजार कोटी रुपयांची दारू पितो. एकंदरीत काय तर कायदा करण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी करणे फारच महत्वाचे आहे जे घडताना दिसत नाही.
No comments:
Post a Comment