Wednesday, 29 April 2020

मोरेवाडी येथे स्थलांतरीतांना धान्य वाटप ..कंदलगाव - प्रतिनिधी

मोरेवाडी येथे स्थलांतरीतांना धान्य वाटप ..
कंदलगाव - प्रतिनिधी 
      संचारबंदीमुळे परराज्य व परजिल्ह्यातील स्थलांतरीत कामगार व मजूरांचे कोरोना काळात मोठे हाल होत असून काम नसल्याने मजूरी मिळत नाही . आशा वेळी अन्न, धान्याची चणचण होऊन उपासमारी होत आहे .
      मोरेवाडी ता . करवीर येथे आ .ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून आशा लोकांसाठी व रेशनकार्ड नसणाऱ्या स्थानिक नागरीकांना धान्य वाटप करण्यात आले .
       यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ . मनिषा वास्कर , प्र . सरपंच रामदास मोरे , सदस्य अमर मोरे , दत्तात्रय भिलुगडे , श्रीमती सुनिता जाधव, सौ . शशिकला भोसले , शिवाली देसाई , वैशाली भोसले , शिला परिट , बाबुराव भोसले , राजेंद्र परिट , सुदर्शन पाटील , रेशन दुकानदार पत्रावळे मॅडम यांची उपस्थिती होती .
फोटो  - मोरेवाडी येथे धान्य वाटप करताना ग्रामपंचायत पदाधिकारी ..

No comments:

Post a Comment