प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
ता २६
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर कोरियाची हुकूमशहा किम जोंग उन यांच्या प्रकृती संदर्भात एक सनसनाटी बातमी हॉंगकॉंग मधील एच के एस टी व्ही या वृत्तवाहिनीने दिली असून यामध्ये या वाहिनीने किम जोंग यांचे निधन झाले असल्याचे सांगितले आहे. परंतु यासंदर्भात अधिकृत सुत्राद्वारे कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
किम जोंग उन यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वी कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर रोज त्यांच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत होत्या.
जगभरातील अनेक मोठमोठ्या वृत्त संस्थांमध्ये किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी परस्पर विरोधी बातम्या येत आहेत.
किंग जॉन यांच्यावर उपचार करण्यासाठी चीनचे एक पथक उत्तर कोरिया मध्ये गेले असून या पथकातील अधिकाऱ्यांनी मात्र यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा केला आहे.
दक्षिण कोरिया व अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा यासंबंधी नेमकी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.