कंदलगाव - प्रकाश पाटील
तरुणमुली , स्त्रीयांवरील वाढते अत्याचार यामुळे शहरासह ग्रामीण भागात भितीचे वातावरण असून आशा भ्याड कृत्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार सुद्धा करणे म्हणजे कायमची दहशत ओढून घेतल्याचा प्रकार होत असल्याने आशा गुंडाविरोधात तक्रारही होत नाही .
अशावेळी आपण आपली सुरक्षा करणे महत्वाचे मानून गावामध्ये गेल्या १२ वर्षापासून परिसरासह पर जिल्ह्यातील मुलींना स्वसंरक्षानाचे धडे देऊन आपले आपण कसे संरक्षण करावे हे शिकविण्यासाठी वस्ताद प्रमोद पाटील यांनी गिरगावमध्ये क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे यांच्या नावाने मर्दानी आवाडा सुरू करून आतापर्यत सुमारे ७०० मुला , मुलींना दांडपट्टा , लाठी- काठी सारखे प्रशिक्षण देऊन स्वसंरक्षणात पारंगत केले आहे .
आपला व्यवसाय संभाळत गावातील व गावाबाहेर मुलींना संरक्षणाच्या लढ्यात तयार करून आपण स्वतः आपले कसे संरक्षण करू शकतो हे दाखवुन दिले आहे .
पुणे , औरंगाबाद , जालणा , कोल्हापूर , सातारा सह इतर जिल्ह्यात त्यांचे विद्यार्थी आजही सराव करीत आहेत .
फोटो - गिरगावचे वस्ताद प्रमोद पाटील आपल्या पदकांसह .
वस्ताद ट्रेनींग घ्यायचे असेल तर गिरगावला यावे लागेल कि ज्या त्या गावी
ReplyDelete