▼
Monday, 27 April 2020
नंदगावातील युवकाचा समाजोपयोगी उपक्रम
नंदगाव : विजय हंचनाळे नंदगावातील युवकाने लोकांच्या सोयीसाठी अल्प दरात सायलेज ( मृग घास ) दूध उत्पादक शेतकऱ्यांना बॅॅग्ज उपलब्ध करून दिल््याआहेत. अनेक दिवसांचा लॉक डाऊन असल्याने वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे आणि त्यामुळे गोकूळ दूध संघाकडून सायलेज बॅगचा पुरवठा बंद करण्यात आला आहे . पावसाळी हंगाम उंबरठ्यावर येवून ठेपला आहे भात पिक घेण्यासाठी शेतक ऱ्यांनी ऐन हंगामात शाळू , मका कापणी केली आहे . पण ते वैरणीच्या तुटवडयाच्या काळात सायलेज बॅगची कमतरता अश्या संकटात शेतकरी सापडला असताना .नंदगाव ( ता करवीर ) मधील दिपक राजाराम पाटील या युवकांने शेतकऱ्यांना सायलेज बॅग उपलब्ध करून शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न दूर केला आहे त्याने या उपलब्ध करून दिलेल्या सायलेज बॅग मुळे परिसरातील शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे .
No comments:
Post a Comment